मुजफ्फरनगर : केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण धोरणाला प्रोत्साहन दिल्यानंतर उत्तर प्रदेशने यामध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आता देशातील सर्वात मोठे इथेनॉल उत्पादक राज्य म्हणून समोर आले आहे. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ यामध्ये उत्तर प्रदेशात स्थापन ५४ डिस्टिलरींमधून एकूण ५८ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले. इथेनॉल उत्पादनात बिजनौर, शामलीसह मुजफ्फरनगर जिल्हाही अग्रेसर आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तीन डिस्टिलरींनी २०२०-२१ मध्ये ६.७३ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. जिल्हा अबकारी अधिकारी उदय प्रकाश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तीन डिस्टिलरींनी सुमारे ६.७३ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. त्यामध्ये त्रिवेणी एल्काने ४.३० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. तर टिकौला साखर कारखाना आणि मन्सूरपूर डिस्टिलरीचे उत्पादन अनुक्रमे १.१२ कोटी लिटर आणि १.३१ कोटी लिटर झाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link