पुणे: अलिकडेच झालेल्या मुसळधार पावसाने आणि महापुरामुळे महाराष्ट्राला उद्ध्वस्त केले आहे. सुमारे २.५ लाख हेक्टरमधील पिकाला फटका बसला आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, पुरामध्ये मक्का, सोयाबीन, भुईमुग पिकासह भाजीपाला, भात, ऊस अशा पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, ऊस उत्पादकांचे इतर पिकांच्या तुलनेत कमी नुकसान झाले आहे.
आतापर्यंत ऊस पिकाचे कोठार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ५०,००० हेक्टर ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. सांगली, पुणे, सातारा जिल्ह्यात सरासरी ४००० हेक्टर ऊस खराब झाला आहे. तर वाशिम, अकोला, नागपूर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये एकूण ३०,००० हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन, भाजीपाला, भुईमुग यांच्या नुकसानीच्या तुलनेत उसाचे कमी नुकसान झाले आहे. उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे यांनी सांगितले की, ऊस पिक ऊन्ह आणि पावसाच्या टोकाच्या स्थितीतही टिकून राहतो. ते म्हणाले, जर पिकाचा वरील भाग दहा दिवसांपर्यंत पाण्यात बुडाला असेल तरीही ऊस टिकू शकतो. जुलैमध्ये पूर आले आहे. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी ऑक्टोबरपर्यंत पुरेसा वेळ आहे. पुराच्या पाण्यासोबत जमिनीत चांगल्या प्रतीची माती येते. त्याचा ऊस पिकाला फायदा होईल. साखर उद्योगाला फारसे नुकसान होणार नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link