आयएमएफने भारताच्या सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज २०२१-२२ साठी घटवला आहे. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी देशाचा जीडीपी रेट घटवून ९.५ टक्के केला आहे. यापूर्वी आयएमएफने हा दर १२.५ टक्के राहील असे अनुमान वर्तवले होते.
मात्र आयएमएफने पुढील वर्षाच्या आर्थिक दरात वाढ दर्शवली आहे. २०२२-२३ मध्ये जीडीपीचा वाढीचा दर ६.९ टक्के राहील असे आयएमएफने एप्रिलमध्ये म्हटले होते. मात्र आता त्यामध्ये वाढ करून ८.५ टक्के केले आहे. आयएमएफने जागतिक वाढीचा दर मात्र स्थिर ठेवला आहे. हा दर २०२१ मध्ये ६ टक्के राहील. तर २०२२ मध्ये ४.९ टक्के राहील. कोरोनाविरोधी लसीकरण सुरू असले तरी काही देश आता पूर्वपदावर येऊ शकतात. मात्र काही देशांमध्ये कोविडने विध्वंस केला. आयएमएफने या दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये विभागणी केली आहे. एसअँडपी ग्लोबल रेटिंगने देशाच्या आर्थिक वाढीचा वेग मंदावेल असे म्हटले आहे. यापूर्वी एसअँडपीने हा दर ९.५ टक्के आणि २०२२-२३ मध्ये ७.८ टक्के राहील असे म्हटले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link