पोरवोरिम, गोवा: गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याच्या भवितव्याबद्दल अद्याप अनिश्चित स्थिती आहे. मात्र, हा कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.
Heraldgoa.in मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले की, संजीवनी साखर कारखाना कायमस्वरुपी बंद राहणार नाही. तो सुरू व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी विस्तृत डीपीआर तयार करण्यासाठी दोन सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत. कारखाना बंद झाल्याच्या कालावधीत सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ७.६७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. १३० शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उप मुख्यमंत्री कवळेकर म्हणाले, राज्य सरकारने शेतीला लाभदायक क्षेत्र बनविण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link