नवी दिल्ली : दालमिया उद्योग समुहाची दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजने इथेनॉल उत्पादनासाठी धान्यावर आधारित दोन नविन डिस्टिलरी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी कंपनीकडून २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाने जवळपास सहा कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्यासाठी दोन नव्या डिस्टिलरी स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. पुढील १५ ते १८ महिन्यांत हे युनिट सुरू होण्याची अपेक्षा आहे.
दालमिया शुगरने सांगितले की, त्यांच्या सध्याच्या युनिटची उत्पादन क्षमता १० कोटी लिटर आहे. संचालक मंडळाकडून यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये विस्तारीकरणाला दिलेल्या मंजुरीनंतर उत्पादन क्षमता १५ कोटी लिटरवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर आता नव्या युनिटमुळे उत्पादन क्षमता वाढून २१ कोटी लिटरवर पोहोचेल. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा घटून १२४.३४ कोटी रुपयांवर आला. कोविड १९ मुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे साखर विक्रीवर परिणाम झाल्याने नफा घटला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link