पाटणा : पुरामुळे ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कृषी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ऊस उद्योग विभागाने अहवाल मागितला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे.
ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत बोलताना विभागीय सचिव डॉ. एन. श्रवण कुमार म्हणाले, अलीकडेच आलेल्या पुरामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या पिकाची भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत कृषी विभाग कार्यवाही करेल असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी अर्ज घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे.
बैठकीत गळीत हंगामा २०२०-२१ मधील साखर कारखान्यांनी दिलेल्या ऊस बिलांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ९७.८० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिल्याचे आढळून आले. विभागी सचिव श्रवणकुमार यांनी साखर कारखान्यांना सर्व्हेचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बिहारमध्ये इथेनॉल उत्पादन लक्षात घेऊन चांगल्या प्रजातीच्या उसाचे क्षेत्र एक लाख हेक्टरने वाढविण्याचे आदेश साखर कारखान्यांच्या प्रशासनाला देण्यात आले. मुख्यमंत्री ऊस विकास कार्यक्रमांतर्गत चांगल्या प्रजातीच्या उसाची लावण करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. यावेळी गिरीवर दयाल सिंह, शाहिद परवेज, जय प्रकाश नारायण सिंह, ओंकार नाथ सिंह सह इतर अधिकारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link