मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँकेने २०२१-२२ या आगामी गाळप हंगामात पुण्याच्या यशवंत सहकारी साखर कारखान्यासह १२ कारखाने लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमने वृत्त प्रकाशित केले आहे. हे साखर कारखाने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
राज्य सहकार बँकेकडून सहकारी साखर कारखान्यांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज दिले जाते. साखर कारखाने यासाठी आपला साखर साठा तारण ठेवतात. हंगामाच्या सुरुवातीला बँक वर्किंग फायनान्सची तयारी करते. बँका तेव्हा कारखान्यांच्या आपल्या साखर विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून व्याजासह कर्ज वसुली करते. जर सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज फेडीत उशीर अथवा चूक केली तर बँक अथवा अन्य वित्तसंस्थांकडून कारखाने ताब्यात घेतले जातात आणि त्यांच्या विक्रीची कारवाई केली जाते. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी आतापर्यंत एमएससी बँकेने ४८ साखर कारखान्यांनीच खासगी कंपन्यांना विक्री केली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एमएससी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले की, गेल्या हंगामात सहा कारखाने भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. त्यांचे व्यवस्थापन योग्यरित्या चालले. त्यामुळे कर्ज, भाड्याच्या पूर्ततेसाठी ते नियमित सुरु राहीले. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link