नवी दिल्ली : बिहारचे उद्योग मंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन राज्यात इथेनॉल प्लांट उभारण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी केली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बैठकीत हुसेन यांनी बिहारमध्ये अत्यंत कमी कालावधीत इथेनॉल प्लांटसाठी ३०,३८२.१५ कोटी रुपयांचे प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगितले. या प्रस्तावांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. गुंतवणुकदारांना आवश्यक ती मंजुरी दिली आहे. मात्र, त्रिपक्षीय कराराअभावी बँकांकडून अर्थसाह्याची प्रक्रिया पुढे जात नसल्याची अडचण त्यांनी मांडली.
बिहारने इथेनॉल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण निश्चित केले आहे. असा निर्णय घेणारे ते देशातील पहिले राज्य आहे.
राज्यात आतापर्यंत इथेनॉल युनिट स्थापन करण्यासाठी ३०,३८२.१५ कोटी रुपयांचे प्रस्ताव आल्याचेही सांगण्यात आले.
मंत्री हुसेन यांनी सांगितले की, जर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या मध्यस्थीने तेल वितरण कंपन्या, बँका आणि इथेनॉल युनिट यांदरम्यान, इथेनॉल १०० टक्के खरेदीबाबत सात वर्षांसाठी त्रिपक्षीय करार झाला, तर बिहारमध्ये युनिट स्थापन करण्याच्या कामास गती येईल. मंत्री हुसेन यांनी पेट्रोलियम मंत्रालयाने तेल वितरण कंपन्या, बँका आणि इथेनॉल कंपन्या यांदम्यान शंभर टक्के बायबॅकसाठी त्रिपक्षीय करार करण्याच्या मुद्यावर जोर दिला. बिहारसाठी इथेनॉल सोर्सिंग कोटा अधिक मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली. बिहारमध्ये इथेनॉलसाठी कच्चा माल अधिक आहे. त्यामुळे हा जर जादा कोटा बिहारला मिळाला तर बिहारच्या औद्योगिक मिशनसाठी ते प्रोत्साहनपर ठरेल. याशिवाय सरकारच्या जैव इंधन मोहिमेसाठीही ते पूरक ठरू शकते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link