नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. सध्याच्या ३१ रुपये प्रती किलो दरावरुन किमान ३४-३५ रुपये प्रती किलो दर करावा असा आग्रह धरण्यात आला आहे. जर दरवाढ केली गेली तर ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या नव्या गळीत हंगामापूर्वी उसाची थकबाकी देण्यास मदत मिळेल असे इस्माचे म्हणणे आहे. साखरेच्या एमएसपीमध्ये ३-४ रुपये प्रती किलो वाढ केल्यास हा दर ३४-३५ रुपये प्रती किलोच्या सध्याच्या एक्स मील दरापर्यंत येईल. ग्राहकांवर त्याचा फारसा बोजा पडणार नाही असे इस्माने म्हटले आहे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, इस्माने या पत्रामध्ये एमएसपी वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे. फेब्रुवारी २०१९ नंतर या दरात वाढ झालेली आहे. एमएसपी वाढवून साखर प्रती किलो ३४-३४.५० रुपये प्रती किलो केल्यानंतर साखरेच्या विक्रीतून कारखान्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात सुधारणा होईल. शेतकऱ्यांनाही उसाचा दर देण्याची कारखान्यांची क्षमता वाढेल. जर साखरेची एमएसपी ३१ रुपयांवरुन ३४-३४.५ रुपये प्रती किलो केली गेली, तर साखर कारखान्यांना सध्याच्या १६.१ मिलियन टन साखरेच्या साठ्यासाठी सुमारे ४८०० कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल उभे राहू शकेल. २०२१-२२ या हंगामात ३१ मिलियन टनाच्या अंदाजानुसार साखरेच्या उत्पादनाच्या तुलनेत ९२०० कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल मिळेल. पत्रात म्हटले आहे की साखर उद्योगाला मिळणाऱ्या अतिरिक्त निधीतून आणि साखर विक्रीच्या पैशांतून शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची पूर्तता केली जाणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link