आता ब्राझीलनंतर अर्जेंटिनाच्या तुकुमान प्रांतामध्येही उसाच्या उत्पादनावर जून आणि जुलै महिन्यातील थंडीचा फटका बसल्याचे दिसून आले आहे.
एस्टासियन एक्स्प्रिमेंटल अॅग्रोइंडस्ट्रियल ओबिस्पो क़लम्ब्रेस संशोधन केंद्राने (ईईएओसी) दिलेल्या आकडेवारीनुसार थंडीमुळे साखरेच्या उत्पादनात १,५०,००० मेट्रिक टनापर्यंत घट दिसून आली आहे. दहा ऑगस्ट रोजी ईईएओसीने आपला नवा अंदाज जारी केला आहे. या अनुमानानुसार विभागातील साखर कारखाने या हंगामात १४.२ मिलियन टन उसाचे गाळप करतील. त्यातून साधारणतः १.२५ मिलियन टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
ईईएओसीचे संचालक जॉर्ज स्कँडेलियारीस यांनी सांगितले की, तुकुमानमध्ये थंडीने ऊसपट्ट्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता कमी झाली आहे.
ब्राझीलमध्ये थंडीमुळे उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात मोठी घट दिसून आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link