इंधन दर बुधवारी स्थिर राहिल्याने पेट्रोलच्या दरात बदल करण्यात आले नाहीत. मात्र, तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात किरकोळ कपात केली आहे. आज सलग ३२व्या दिवशी पेट्रोलचे दर स्थिर राहीले. तर डिझेलचे दर २० पैशांनी कमी झाले. सोळा जुलैपासून डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोलच्या किमतीमध्ये १७ जुलै रोजी अखेरचे बदल करण्यात आले होते. दरात कपातीनंतर दिल्लीत डिझेलचा दर ८९.६७ रुपये प्रती लिटर आहेत.
चेन्नई, पंजाबसह देशातील बहुतांश भागात पेट्रोलचा दर १०० रुपये लिटरवर पोहोचले आहेत. तर अनेक शहरांमध्ये डिझेलच्या दरानेही शतक गाठले आहे. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईत पेट्रोलचे दर १०० रुपयांवर आहेत. चेन्नईक पेट्रोलचा दर १०१.४९ रुपये लिटर तर डिझेल ९४.२० रुपये लिटर आहे. तर दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आणि कोलकातामध्ये १०२.०८ रुपये प्रती लिटर आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासारख्या महानगरात पेट्रोल १०० रुपयांवर आहे. वाहतूक शुल्क आणि व्हॅट आकारणीमुळे विविध राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे असतात.
पश्चिम बंगाल, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडीसा, तामिळनाडू, केरळ, बिहारसह विविध राज्यांत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. तर डिझेलचा दरही राजस्थानातील श्रीगंगानगर, हनुमानगड जिल्ह्यात तसेच ओडिसातील काही भागात शंभर रुपयांवर आहे. तेल कंपन्यां आंतरराष्ट्रीय दरांच्या पंधरा दिवसांच्या कालावधीच्या अनुषंगाने दररोज दरांची फेररचना करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link