देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे ४६,१६४ रुग्ण, ६०७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसू लागली आहे. गेल्या २४ तासात संक्रमित झालेले नवे ४६,१६४ रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशभरात ८० लाख ४० हजार ४०७ जणांना कोरोनाविरोधी लस देण्यात आली. तर आतापर्यंत ६० कोटी ३८ लाख ४६ लाख ४७५ जणांचे लसिकरण पूर्ण करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे ४६,६०७ रुग्ण आढळल्यानंतर संक्रमितांची एकूण संख्या तीन कोटी २५ लाख ५८ हजार ५३० झाली आहे. या दरम्यान ३४ हजार १५९ रुग्ण बरे झाल्याने एकूण तीन कोटी १७ लाख ८८ हजार ४४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. या कालावधीत सक्रिय रुग्णसंख्या ११,३९८ ने वाढून तीन लाख ३३ हजार ७२५ वर पोहोचली आहे. याकाळात ६०७ जणांचा मृत्यूने एकूण मृतांची संख्या ४,३६,३६५ झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांचा दर १.०३ टक्के झाला आहे. तर रिकव्हरी दर घटून ९७.६३
टक्के आणि मृत्यूदर १.३४ टक्के इतका झाला. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४३५ नवे रुग्ण वाढून सक्रीय रुग्णसंख्या ५३,६९५ झाली आहे. या कालावधीत ४३८० जण बरे झाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६२,४७,४१४ झाली. तर २१६ जणांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या १,३६,५७१ झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here