इथेनॉलप्रश्नी बिहारचे मंत्री हुसेन यांनी घेतली पियूष गोयल यांची भेट

पाटणा : उद्योग मंत्री शहनवाज हुसेन यांनी दिल्लीत केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांची भएट घेतली. शंभर टक्के बायबॅकसाठी इथेनॉल युनिट, बँका आणि तेल वितरण कंपन्यांमध्ये (ओएमसी) सात वर्षासाठी त्रिपक्षीय करार करावा असा आग्रह हुसेन यांनी धरला आहे. याशिवाय बिहारच्या इथेनॉल युनिटना केंद्र सरकारच्या अनुदान योजना आणि बँकांच्या आर्थिक योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे केली.
दिल्लीतील उद्योग भवानात झालेल्या या भेटीवेळी हुसेन यांनी बिहारमध्ये दोन टेक्स्टाईल पार्क तयार करण्याचीही मागणी केली.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हुसेन म्हणाले, भारत सरकारच्या मेगा टेक्स्टाईल पार्क योजनेअंतर्गत १००० एकर जमिनीची गरज आहे. मात्र बिहारसारख्या कृषीप्रधान राज्यात अशी एकत्र जमिन आढळणे अवघड आहे. बिहार सरकारकडे टेक्स्टाईल पार्कसाठी २०० एकरापर्यंतचे भूखंड आहेत. जर केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केली तर राज्यात तत्काळ दोन टेक्स्टाईल पार्क विकसित केले जाऊ शकतात.
गोयल यांच्याशी झालेल्या भेटीनंतर हुसेन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ही भेट खूप फलदायी ठरली. बिहारमध्ये २००-२०० एकरामध्ये दोन टेक्स्टाईल पार्कसाठी केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here