मेरठ: दौराला साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या उसापोटी सर्व पैसे उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.
साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक संजीव खाटीयान यांनी सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगाम १९ मे २०२१ रोजी समाप्त झाला होता. कारखान्याने २२८.०४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. त्यापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ७३० कोटी रुपये देणे अपेक्षित होते. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्याने सर्व ऊस बिले ऊस समित्यांकडे पाठविली आहेत. महा व्यवस्थापक खाटीयान यांनी सांगितले की, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना गरजेनुसार उसाचा पाणी द्यावे आणि आवश्यक तेवढ्याच युरीयाचा वापर करावा. ऊस समितीचे सचिव प्रदीप यादव यांनी सांगितले की, ऊस आयुक्तांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना ऑनलाईन घोषणापत्र भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सचिव यादव यांनी यावेळी केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link