लोकल सर्च इंजिनची मालकी आता रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा अधिकार असेल. कंपनीच्या संचालक मंडळाने मोठ्या संख्येने आपले शेअरस् रिलायन्स रिलेटला अलॉट करण्यास मंजूरी दिली आहे.
जस्ट डाइलने गुरुवारी याबाबत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स कंपनीला २.१२ कोटी शेअर अलॉट करण्यास मंजुरी दिली आहे. शेअरचे अलॉटमेंट १,०२२.२५ रुपये प्रती शेअरच्या आधारावर करण्यात आले आहे. दहा रुपयांच्या फेस व्हॅल्यू असलेले शेअर्स कंपनीला १०१२.२५ रुपये प्रिमीयमवर मिळाले आहेत. त्याच आधारावर प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून अलॉट करण्यात आले आहे.
या शेअरच्या आधारावर रिलायन्स रिटेलच्या आधारावर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर जस्ट डायलच्या एकूण शेअर्सपैकी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची हिस्सेदारी ४०.९८ टक्के झाली आहे. यामध्ये जस्ट डाइल लिमिटेडचे सर्व नियंत्रण मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपकडे असेल. दरम्यान, रिलायन्स रिटलने अधिकृत सांगितले की, जुलै महिन्यात त्यांनी जस्ट डाईलचे १.३१ कोटी शेअर आपल्या ताब्यात घेतलो होते. त्यासाठी कंपनीने दहा रुपये किमतीचे १०२० रुपये प्रती शेअर पैसे दिले होते.
जस्ट डायलचे अधिग्रहण केल्यानंतर रिलायन्सकडे त्यांचा डेटा बेस आणि कोट्यवधी व्यावसायिक असतील. त्यातून त्यांना आपला रिटेल व्यवसाय वाढविण्याची मदत मिळेल. जस्ट डायल गेल्या २५ वर्षांपासून नोंदणीकृत आहे. रिलायन्सने रिटेल सेक्टर वाढविण्यासाठी आपले प्रयत्न चालू केले आहेत. यापूर्वी त्यांनी फ्युचर ग्रुपच्या फ्युचर रिलेटशी सौदा केला होता. मात्र, अमेरिकन ई कॉमर्स कंपनी अमेझॉनसोबत त्यांचा वाद सुरू आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link