नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांच्यावतीने आज, सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. गेल्या बुधवारी पेट्रोलच्या दरात १३ ते १५ पैसे तर डिझेलच्या दराच १५-१५ पैशांनी कपात करण्यात आली होती. मात्र, देशातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे.
आज दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.३४ रुपये तर डिझेलचा दर ८८.७७ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०७.३९ रुपये आणि डिझेलचा दर ९६.३३ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०१.७२ रुपये तर डिझेलचा दर ९१.८४ रुपये लिटर आहे. तर चेन्नईतही पेट्रोल ९९.०८ रुपये लिटर आणि डिझेल ९३.३८ रुपये लिटर आहे.
सद्यस्थितीत मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे. मुंबईत तर सर्वाधिक दराने पेट्रोल विक्री केली जाते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link