बिजनौर : वेव्ह ग्रुपच्या बिजनौर साखर कारखान्यात आता ब्रेकडाऊन होणार नाही. उसाच्या गाळपात वाढ होणार आहे. यासाठीचे क्रशिंग सेट रोलर बसविण्यात येत आहे. त्यामुळे उसापासून अतिरिक्त रस निर्मिती होईल आणि कारखान्याच्या उताऱ्यातही अर्धा टक्क्याची वाढ होईल.
बिजनौर साखर कारखान्यात आता देखभाल, दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या हंगामात कारखान्यातील काही त्रुटींची पूर्तता केली जात आहे. कारखान्यात चार क्रशिंग रोलर आहेत. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. त्यानंतर कारखान्यात पाच रोलर होतील. त्यामुळे उसाच्या रसाचे अतिरिक्त उत्पादन होईल आणि तोटाही कमी होईल. यासोबतच तीन मेगावॅटचे टर्बाईन बसविण्यात येत आहे. यापूर्वी २.५ मेगावॅटचे टर्बाईन होते. त्यामुळे विजेची टंचाई कमी होणार आहे. या वीज उत्पादनातून कारखाना सहजरित्या चालू शकेल. साखर कारखान्यात ऊस बारीक करण्यासाठीचे यंत्र बसवले जात आहे. स्विंग टाइप फाइवरायझर यंत्रामुळे उसाचे छोटे तुकडे केले जातील. त्यातून उसाचे गाळप गतीने होईल.
कारखान्याचे प्रशासन अधिकारी ए. के. सिंह यांनी सांगितले की, हंगाात नियमित सफाईसाठी कारखाना ४८ तास बंद ठेवावा लागत होता. मात्र, आता नियमित सफाईसाठी कारखाना बंद केला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाच्या गाळपासाठी ताटकळत बसावे लागणार नाही. कारखान्यात दररोज २५ ते २७ हजार क्विंटल उसाचे गाळप व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिजनौर कारखान्यात आणखी एक सेट क्रशिंग रोलर बसविण्यात येत आहे. त्यातून अर्धा टक्का उतारा वाढेल असे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link