रेवाडी : हरियाणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे सर्व पैसे दिले गेले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी दिली. कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाची बिले मिळाली आहेत असे त्यांनी बावल येथे नागरिकांच्या समस्यांबाबत आयोजित एका मेळाव्यानंतर सांगतिले.
सहकार मंत्र्यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याबाबत आश्वस्त केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी लांब अंतरावर करुन उसाची लागण करावी. त्यातून हार्वेस्टर यंत्राद्वारे उसाची तोडणी योग्य पद्धतीने करता येईल. हार्वेस्टरमुळे ऊस तोडणीचा खर्च कमी येईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होऊ शकेल. सर्व कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारखान्यातील देखभाल, दुरुस्तीचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी दिले. गाळप हंगामात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्याबाबत नियोजन करावे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा राज्यात सरकारकडून उसाला सर्वाधिक दर दिला जातो असे मंत्र्यांनी सांगितले. आमचे कारखाने चांगले काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात साखरेचा दर ३५-३६ रुपये प्रती किलो आहे. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. नागरिकांनी वीज, पाण्यासह इतर समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link