लखनौ : उत्तर प्रदेशच्या ऊस विकास विभागाने २०२१-२२ या हंगामात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन लागू करण्याची योजना तयार केली आहे. या तंत्राच्या माध्यमातून शेतकरी उसाच्या शेतीसाठी आवश्यक सिंचनासाठी पाणी कमी प्रमाणात वापरु शकतात. त्यातून राज्यातील २५०० हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ऊस विभागाने दिलेल्या एका अधिकृत माहितीनुसार, ठिबक सिंचन योजना हे ऊस विभागाचे दीर्घकालीन प्रयत्न आहेत. त्यातून पाणी बचतीचे तंत्र शेतकऱ्यांसमोर समृद्ध बनविणार आहे. ऊस विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यातील २५६६ शेतकऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ठिबक सिंचनामुळे शेतीच्या पाणी वापरात ५० ते ६० टक्क्यांपर्यंतची बचत केली जाते.
इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ऊस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, या तंत्राने भूजलाच्या वापरात खूप कपात होईल. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ३० हजार हेक्टर क्षेत्रात ठिबक सिंचन युनिट बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर योजनेचा विस्तार होईल. बीपीएल कार्डधारक, अनुसूचित जाती तसेच आदिवासी शेतकऱ्यांसह अल्प भूधारकांना याचा लाभ मिळेल. पाण्याच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे त्यांनी सांगितले. सरकार ही योजना मोठ्या प्रमाणावर लागू करण्याचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे आणि त्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नात वाढ होईल असा यामागील उद्देश आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link