ऊसाची बिले न देणाऱ्या कारखान्याला टाळे ठोकण्याचा इशारा

बरेली: साखर कारखान्याने १५ सप्टेंबरपर्यंत शंभर कोटी रुपयांच्या ऊस बिलांचे वितरण न केल्यास कारखान्याला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण वर्मा यांनी दिले. बजाज कारखान्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी अखिलेश यादव यांच्या स्टेनोकडे सुपूर्द केले.

गोला साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांकडून गाळपासाठी ५१० कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. मात्र, गेल्या दहा महिन्यात शेतकऱ्यांना फक्त १४० कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. एकूण २० दिवसांच्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांचे ३७० कोटी रुपये दिलेले नाहीत. जर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर कारखान्याला टाळे ठोकण्यात येईल. याबाबत घडणाऱ्या घटनेची जबाबदारी प्रशासनाची असेल.
दरम्यान, ऊस विकास समितीचे नंदलाल माथूर म्हणाले, की कारखाना सुरू करण्यापूर्वी ऊस बिले देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऊस शेजारील इतर कारखान्यांना पाठवला जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here