लखीपमपूर खीरी (उत्तर प्रदेश): चीनी मंडी
साखर कारखान्यांमध्ये होत असलेल्या वजनाची माहिती तसेच पावती आता शेतकऱ्यांना एसएमएसवर मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील कारखान्यांमध्ये या पेपरलेस व्यवस्थेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात हंसपूर, नौवाखेडा, रजरी द्वितीय, रामपूर मक्का तसेच अमृतापूर या ठिकाणी पेपरलेस व्यवस्था लागू करण्यात येत आहे. त्याठिकाणी आता शेतकरी त्यांच्या मोबाईलवर आलेली पावती दाखवून उसाचे वजन करू शकणार आहेत. यामुळे खोट्या पावत्यांचा प्रकारही बंद होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवरण करण्यासाठी गोला येथील ऊस समितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे साखर कारखान्यांचे पदाथिकारी, कर्मचारी यांच्यासह एक संयुक्त बैठक झाली. तेथे एसएमएसद्वारे शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले.
या संदर्भात एक आठवड्यात पाच पाच केंद्रांवर ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. ऊस आयुक्तांच्या आदेशानंतर ही प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. पुढच्या हंगामात ऊस वजन पूर्णपणे पेपरलेस होणार आहे. यामुळे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण बचत होणार आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp