गुजरातमध्ये आलेल्या महापुराने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांनी आपले रौद्र रुप धारण केले आहे. आणि आता पुरात अनेकांचा संसार वाहून जात आहे. अनेकांची घरे वाहून गेला आहेत तर अनेकांची सारी संपत्ती पुरात बुडाली आहे. सौराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने झालेल्या दुर्घटनांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राजकोट आणि जामनगरमध्ये नद्यांना उधाण आले आहे. प्रशासनाच्यावतीने राजकोटमध्ये मंगळवारीही जोरदार पावसाचा अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
सौराष्ट्रमध्ये सध्या बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. जामनगर आणि राजकोटमध्ये अनेक लोक पुरात अडकले आहेत. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांची पुरातून सुटका करण्यात येत आहे. पावसामुळे गुजरातच्या या पूरग्रस्त विभागातील विदारक स्थिती दिसून आली आहे. लोकांवर आपली घरे सोडण्याची वेळ आली आहे. महापुराचा तडाखा इतका जबदरस्त आहे की, अनेकजण वाहून गेले आहेत. घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे लोकांसमोर राहण्यासाठीही जागा शिल्लक राहीलेली नाही. जामनगरच्या विविध गावांतून ५० लोकांना एअरलिफ्ट करण्यात आले. तर राजकोटमधील तीन गावांमदून २२ जणांना वाचविण्यात आले. या पावसाने रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक घरे कोसळली आहेत. महापुराने रेल्वेचे ट्रॅकही उखडले आहेत. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या इतर मार्गांवर वळविण्यात आल्या आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link