तेलंगणा सरकारकडून निजाम साखर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न?

हैदराबाद : तेलंगणा सरकारकडून निजाम साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पंचायत राज मंत्री एराबेली दयाकर राव यांनी सोमवारी याबाबत संकेत दिले आहेत. कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे असे त्यांनी सांगितले. सरकारने पुन्हा एकदा या कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या शक्यतेवर आपले काम सुरू केले आहे. राज्य सरकार आता शेतकऱ्यांना भाताच्या शेतीपासून दूर नेऊन उसासारख्या नगदी पिकांकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

१९३७ मध्ये सातव्या निजामांकडून स्थापन करण्यात आलेल्या निजाम शुगर मिलला निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेड (एनडीएसएल) या नावानेही ओळखले जाते. हा कारखाना तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात आहे. एकेकाळी आशियातील सर्वात मोठा साखर कारखान्याचा बहुमान या कारखान्याला होता. मात्र, गेल्या दशकभरापासून कारखाना बंद आहे. अविभाज्य आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी कारखान्याचे खासगीकरण केले होते. त्यानंतर वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी याचे पुनरुज्जीवन केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, तसे घडलेले नाही. टीआरएसने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या आंदोलनासोबत निवडणुकीच्या काळात सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात कारखान्याचे पुनरुज्जीवन केले जाईल अशी घोषणा केली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here