सांगली : नीती आयोगाने तीन हप्त्यामध्ये एफआरपी देण्याचा दिलेला प्रस्ताव स्वीकारार्ह नाही असे स्पष्ट प्रतिपादन बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी केले. याबाबत शुगर कंट्रोल बोर्डाशी चर्चा केली जाईल. बळीराजा शेतकरी संघटना, अंकुश संघटन आणि जय शिवराय संघटना या तीन शेतकरी संघटनांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, नीती आयोगाने शेतकऱ्यांनी पहिल्यांदा ६० टक्के आणि नंतर दोन टप्प्यात प्रत्येकी २०-२० टक्के एफआरपी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारा आहे. जर शेतकऱ्यांना चौदा दिवसात एकरकमी पैसे मिळाले तर ते बँकेकडून घेतलेले कर्ज भरू शकतात. त्यांना व्याज भरावे लागणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी सदाशिव कुलकर्णी, तात्यासाहेब कोळी, उत्तम पाटील, गब्बर पाटील आदी उपस्थित होते.