सांगली : कोविड महामारीला रोखण्यासाठी साखर कारखान्यांकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक साखर कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना कोविडविरोधी लस देण्यावर भर दिला आहे.
दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रिज लिमिटेडच्या निनाईदेवी कारखान्याच्या युनिटने सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांचेही लसीकरण केले. शिवाजीराव देशमुख कृषी महाविद्यालयात ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कारखान्यामध्ये एस. रंगा प्रसाद आणि संतोष कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५९ जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी एचआर विभागाचे अधिकारी शिवाजी पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. भूषण मोरे, श्रीराम कोडगुळे, प्रकल्प अधिकारी सुनील कांबळे, विनित रेड्डी, वैभव कदम, इक्बाल डांगे, विक्रम घोलप आदींसह कारखान्याचे प्रमुख पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link