मुंबई : दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने भारतीय शेअर बाजाराला कंपनीकडून १५ सप्टेंबर रोजी एफएमसीजी उत्पादन दालमिया उत्सव हनी (मध) उत्पादन सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत कंपनीने हे उत्पादन दाखल केले आहे.
या वृत्तानंतर भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवाती सत्रामध्ये दालमिया भारत शुगरच्या शेअरने उसळी घेतल्याचे दिसून आले. दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजचा शेअर १.९४ टक्के म्हणजे ८.०५ रुपयांच्या वाढीसह ४२२.०० रुपयांवर बंद झाला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link