नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. गुरुवारी पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५९,००० चा टप्पा गाठला. यासोबतच भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅपिटल ३.४ लाख कोटी डॉलरवर (मिलियन) पोहोचले. यासोबतच भारतीय शेअर बाजार आता फ्रान्सला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकावर आला आहे.
शुक्रवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात पॉझिटिव्ह झाली. लवकरच सेन्सेक्स ६०,००० च्या अंकाला स्पर्श करु शकेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार आगामी काही दिवसांत शेअर बाजार हा टप्पा गाठू शकेल. सद्यस्थितीत शेअर बाजाराने ३.४० ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपिटलचा टप्पा पार केला आहे.
ब्लुमबर्गच्या एका अहवालानुसार अमेरिकेत शेअर बाजार सध्या मार्केट कॅपिटलनुसार जगात पहिल्या क्रमांकावर आहे. वॉलस्ट्रीटचे मार्केट कॅपिटल ५१ ट्रिलीयन डॉलरच्या पलीकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनचा शेअर बाजार असून त्याचे मार्केट कॅपिटल १२ ट्रिलीयन डॉलर आहे. जपान शेअर बाजाराचे मार्केट कॅपिटल ७ ट्रिलियन डॉलर असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. हॉंगकॉंगचे मार्केट ६ ट्रिलीयन डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आणि ब्रिटनचा शेअर बाजार ३.८ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपिटलसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारत आता ३.४१ ट्रिलियन डॉलरसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून फ्रान्सचे मार्केट कॅपिटल ३.४० ट्रिलियन डॉलरसह सातव्या क्रमांकावर घसरले आहे. अहवालानुसार भारतीय शेअर बाजारात यंदा ८७४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅपिटल २.५२ ट्रिलियन डॉलर होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link