अंबाला : नारायणगड साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू न होण्याची शक्यता असल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी बैठक आयोजित केली. यावेळी २८ सप्टेंबर रोजी पंचकुलामध्ये हरियाणाच्या ऊस आयुक्तांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियन (बिकेयू), हरियाणा (चारुनी), बिकेयू (टिकैत) आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या (जीकेएसएस) अंबाला जिल्ह्यातील साहा येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बिकेयूच्या (चारुनी) ५० हून अधिक शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या अधिकाऱ्यांसमवेत कुरुक्षेत्रमध्ये शाहाबाद सहकारी साखर कारखान्यामध्ये बैठक आयोजित केली. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नावाने एक निवेदन देण्यात आले.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साहा येथील बैठकीत शेतकऱ्यांनी सांगितले की, नारायणगड साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात अद्याप शेतकऱ्यांचे ७० कोटी रुपये दिलेले नाहीत. आता नारायणगड साखर कारखान्याचा ऊस कर्नाल, शाहबाद आणि यमुनानगर या तीन साखर कारखान्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे ३०,००० शेतकरी चिंताग्रस्त आहेत. बिकेयुचे अंबाला जिल्हाध्यक्ष मलकायत सिंह म्हणाले, याप्रश्नी ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय झाला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link