मुजफ्फरनगर : चीनी मंडी
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या थकबाकीचा प्रश्न चिघळला असून, आता याविषयावर साखर कारखान्यांचे व्यवस्थापन रडारवर आले आहे. शेतकऱ्यांची ८० लाख रुपयांची थकबाकी न दिल्याप्रकरणी शामली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी दिली. कारखाना व्यवस्थापनामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी यांच्यावर ८० लाख रुपयांच्या थकबाकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या थकबाकीच्या मागणीसाठी कारखान्यांच्या बाहेर निदर्शने सुरू केली आहेत.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp