व्हिएतनामकडून थायलंडच्या साखर आयातीचा तपास सुरू

हनोई : व्हिएतनामच्या व्यापार मंत्रालयाने सांगितले की, थालयंडमध्ये उत्पादन केलेली साखर डंपिंग विरोधी करांपासून वाचविम्यासाठी शेजारील देशांच्या माध्यमातू आयात करण्याच्या आरोपांचा तपास सुरू करण्यात आला आहे. व्हिएतनामने जून महिन्यात जगातील द्वितीय क्रमांकाचे साखर निर्यातदार असलेल्या थालयंडच्या काही साखर उत्पादनांवर पाच वर्षांसाटी ४७.६४ टक्के डंपिंगविरोधी लेव्ही लागू केली आहे.

याबाबत स्थानिक फर्म्सकडून विविध आरोप केले गेले आहेत. साखरेच्या उत्पादांना लाओस, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि म्यानमारहून आयात केले जात आहेत. ही उत्पादने त्यांच्या देशात उत्पादित होत नाहीत. याबाबत व्यापार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हिएतनाममध्ये साखर आयात एक वर्षाच्या आधीच्या समान कालावधीच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर २०२० ते जून २०२१ पर्यंत पाच पटीने वाढून ५,२७,००० टन झाली आहे. मात्र, या कालावधीत थायलंडहून साखर आयात ३८ टक्क्यांनी घसरली आहे. थायलंडचे उप वाणिज्य मंत्री संसर्न समालपा यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, मंत्रालयाला व्हिएतनामकडून सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती आहे. व्हिएतनाममध्ये थायलंडचे अधिकारी तपास करणार आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here