कर्नाटक: सुवर्ण विधानसौधमध्ये होणार साखर संचालनालयाचे स्थलांतर

बेळगाव : साखर संचालनालय कार्यालय सुवर्ण विधानसौधमध्ये (एसव्हीएस) स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. बेळगाव येथील शासकी विश्रामगृहामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उत्तर कर्नाटकमधील लोकांची ही दीर्घकाळ मागणी होती. सरकारने याबाबत आधीच आदेश जारी केले आहेत.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, साखर संचालनालय ३ ऑक्टोबरपासून अधिकृतरित्या स्थलांतरीत होईल. सरकारने डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संचालनालयाचे स्थलांतर एसव्हीएसमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता असे बोम्मई म्हणाले. थकीत ऊस बिलांबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, साखर कारखानदारांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना थकीत पैसे द्यावेत. अन्यथा त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here