दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार ही फक्त दिखावूगिरी असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे (बसपा) राष्ट्रीय प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केले. जनता या भुलभुलैया फसणार नाही. सरकारने आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करणे, युवकांच्या रोजगाराचा शोध आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतीही समाधानकारक पावले उचललेली नाहीत असा दावा भदौरिया यांनी यावेळी केला.
राज्य सरकारने ऊसाच्या राज्य सल्लागार किमतीत (एसएपी) २५ रुपये प्रती क्विंटलची वाढ केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, बसपाच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी एएसपी दुप्पट केली होती. मात्र, गेल्या पाच वर्षामध्ये सरकारने ऊसाचा दर १० टक्केही वाढवलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उसाची एसएपी ३२५ रुपयांवरुन वाढवून ३५० रुपये केली आहे. याविषयी भदौरिया यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांची ऊस थकबाकी त्वरीत देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link