भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उत्तर आंध्र प्रदेश आणि त्यालगतच्या दक्षिण ओडीसासाठी एका चक्रीवादळाचा अॅलर्ट जारी केला आहे. २४ सप्टेंबर रोजी पूर्व-मध्य बंगालच्या खाडीवरील कमी दाबाच्या रुपात हे चक्रीवादळ सुरू झाले. २५ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत बंगालच्या पूर्व मध्य खाडीवरुन रात्रीपर्यंत त्याचे रुपांतर एलपीएमध्ये झाले आहे.
शनिवारपर्यंत हे वादळ गतीमान होईल. त्यामुळे रविवारी संध्याकाळी दक्षिण ओरिसा, उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. गुलाब चक्रीवादळाने किनारपट्टीवर आपले अस्तित्व दर्शविले होते. रविवारी रात्री उशीरा ते जमिनीवरून दूर गेले. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम सोमवारी संध्याकाळी उत्तर तेलंगणा, त्यालगतच्या दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भात कमकुवत झाला.
मंगळवारी रात्रीपर्यंत एलपीए कमजोर होऊ शकते. शेवटी ३० सप्टेंबरपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीजवळ पूर्वोत्तर अरबी समुद्रात ते दिसेल. आयएमडीच्या अहवालानुसार यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये बंगालच्या खाडीत चक्रीवादळ (व्हीएससीएस) १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये व्हीएससीएसच्या रुपात तामीळनाडूची किनारपट्टी ओलांडून गेले होते. त्यानंतर ते कमजोर होऊन नंतर १६ नोव्हेंबर २०१८ रोजी दक्षिण पूर्व अबरी समुद्रात दिसले. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याचे रुपांतर गतीमान वादळात झाले. सद्यस्थितीत गुलाब चक्रीवादळाचे परिणाम ओडिसा, आंध्र, छत्तीसगड नंतर पश्चिमेच्या दिशेला पुढे सरकत आहेत. महाराष्ट्रावर सोमवारी याचे परिणाम दिसले. आणखी एक वादळाची शक्यता असली तरी त्याची स्थिती कमजोर असल्याचे सांगण्यात येते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link