हि बातमी तुम्ही आता ऐकू ही शकता
साओ पावलो (ब्राझील) : चीनी मंडी
लंडन आणि न्यूयॉर्कच्या बाजारपेठेत गेल्या आठवड्यात साखरेचा दर थोडा सावरल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्कच्या बाजाराला लागणारी कच्ची आणि लंडनच्या बाजारात असणारी प्रक्रियायुक्त शुद्ध साखर दोन्हीला चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे साखरेची बाजारपेठे वेगळ्या वळणावर असल्याचे दिसत आहे. ब्राझीलची साखरेची निर्यात घसरण्याचा अंदाज असून, साखरेला मात्र पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेचा बाजार सावरण्यासाठी होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात ब्राझीलमध्ये ऊस, साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आला. जर, पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये येत्या काळात वाढ झाली नाही तर, ब्राझीलमध्ये पुन्हा इथेनॉलकडून साखरेच्या उत्पादनासाठी ऊस वापरण्यात येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे भारतात किती साखर उत्पादन होणार आहे. या विषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे उसाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे. भारताने यंदा ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे. पण, हे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. यातील केवळ २५ लाख टन साखरच निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे.
ब्राझीलमध्येही उत्तर भागात कोरडे हवामान असून, रिओ प्रांताला सातत्याने पावसाचा फटका बसत आहे. दरम्यान, उसासाठी थायलंडमध्ये मात्र अतिशय चांगले वातावरण आहे. थायलंडमध्ये ४५० लाख टन ऊस गाळप झाले असून, गेल्या वर्षी ३४० लाख टन गाळप झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ३४ लाख टन साखरेच्या तुलनेत यंदा ४५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.