पीलीभीत : ऊस तथा साखर उद्योगाचे अप्पर मुख्य सचिवांनी ऑनलाईन माध्यमातून जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना पूरनपूर आणि विलासपूरमध्ये सुरू असलेल्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. साखर कारखान्यातील हंगामाच्या तयारीबाबत विचारणा केली. ऊस विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात एलएच शुगर मिल पिलीभीत, पूरनपूर सहकारी साखर कारखाना, विलासपूर सहकारी साखर कारखाना आणि बजाज हिंदुस्थान लिमिटेड बरखेडा हे चार कारखाने सुरू होणार आहेत. जिल्ह्यात दोन लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. गळीत हंगाम २०२१-२२ साठी सर्व कारखान्यांची तयारी सुरू झाली आहे. अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी ऑनलाईन माध्यमातून उसाचे गाळप आणि साखर कारखान्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. गाळपाबाबत विचारणा केली.
ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आढाव्यावेळी सीडीओ प्रशांत श्रीवास्तव, जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र यांच्यासह दोन्ही कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link