नवी दिल्ली : देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दीष्ट गाठले आहे. नोव्हेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या २०२०-२१ या हंगामात मिश्रणाचा स्तर ८.३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) एका अधिकाऱ्याने सांगितले ही माहिती दिली. सन २०१९-२० मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ५ टक्क्यांवर होते.
नवभारत टाइम्स डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) एका वेबिनारमध्ये बोलताना एचपीसीएलचे कार्यकारी संचालक सी. श्रीधर गौड यांनी सांगितले की, सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्ष डिसेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत इथेनॉल मिश्रणाचा स्तर गेल्या दोन वर्षातील ५ टक्क्यांच्या तुलनेत सरासरी ८.२ ते ८.३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पूर्ण देशभरात पोहोचला आहे. गौड यांनी सांगितले की, सिक्कीम हे या टप्प्यातील अंतिम राज्य होते. चार दिवसांपूर्वी आम्ही सिक्कीममध्येही पोहोचलो. सर्व राज्यांमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे काम सुरू आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले आहे आगामी वर्ष २०२१-२२ या इथेनॉल पुरवठा वर्षात पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा सहजपणे गाठता येईल असा विश्वास वाटतो असे गौडा म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link