यंदाच्या हंगामात होणारा साखर पुरवठ्यातील तुट भरुन काढण्यासाठी यंदा कोणत्याही प्रकारे कच्च्या साखरेची निर्यात केली जाणार नाही असे फिलिपाईन्सच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. फिलिपानो येथील एका ऑनलाईन वार्तालापात बोलताना कृषी सचिव विल्यम डार यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकेला साखर निर्यात करण्याची परवानगी देणार नाही.
स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या साखरेचा वापर देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरने (यूएसडीए) २०२१-२२ या हंगामातील आपल्या १,४०,००० मेट्रिक टन साखर निर्यातीच्या पूर्व अनुमानात बदल करुन ते शुन्यावर आणले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link