ढाका : बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय महसूल मंडळाला महागलेल्या कांदा, साखर आणि खाद्यतेलावरील आयात शुल्क स्थगित करण्यास सांगितले आहे.
याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, आवश्यक वस्तूंचा साठा, पुरवठा, आयात आणि दर स्थिर ठेवण्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या एका बैठकीनंतर वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी सांगितले की, आम्ही बाजारातील वस्तूंच्या भडकलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.
साखर आयातीवर पूरक आणि अॅडव्हान्स शुल्क अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यासही सांगण्यात आले आहे.
देशात साखर आणि खाद्य तेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link