बुलंदशहर: ऊस उत्पादकांना दिलासा, २० ऑक्टोबरपासून सुरू होणार नवा गळीत हंगाम

बुलंदशहर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम याच महिन्यात सुरू होणार आहे. जिल्ह्यातील चारही साखर कारखान्यांचे नवे सत्र २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे ऊस विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी कारखान्यांनी तयारी पूर्ण केली आहे. मात्र, उसाची उपलब्धता गरजेची आहे. ऊस विभागाचे अधिकारी ऊस खरेदी केंद्रे तसेच ऊसाच्या वाटपाबाबत लखनौला गेले आहेत. याच आठवड्यात केंद्रे निश्चित केली जातील. काही केंद्रांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातही ऊस वजन केंद्रे बदलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चार कारखान्यांसह शेजारील चार जिल्ह्यातील कारखान्यांकडूनही ऊस खरेदी केला जातो. २०२१-२२ या हंगामासाठी ऊसाचे लागवड क्षेत्र ७३ हजार हेक्टर आहे. त्यामुळे बंपर ऊस उपलब्ध आहे. गेल्यावर्षी १०६ ऊस खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे.

साबितगड, अनामिका, सहकारी आणि वेव शुगर मिलची खरेदी केंद्रे सातही तालुक्यांमध्ये असतील. हापुड जिल्ह्यातील सिंभावली शुगर मिल, बृजनाथपुर कारखाना, अमरोहा येथील चंदनपूर आणि संभल येथील रजपुरा कारखान्याचे ऊस खरेदी केंद्रेही येथे असतील. या आठवड्यात सर्व आठ कारखान्यांना ऊसाचे वाटप होईल. जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी सांगितले की, लखनौतून उसाचे वाटप होणार आहे. याची प्रक्रिया ऊस विभागाने सुरू केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here