नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांशी संबधीत विषयांबाबतच्या एका बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. नॉर्थ ब्लॉकमध्ये एका शिष्टमंडळासोबत ही बैठक झाली. त्याचे नेतृत्व माजी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. साखर कारखानदारांबाबत सरकारच्या काळजीच्या विषयांमुळे ही बैठक महत्त्वपूर्ण होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला. बैठकीला केंद्रीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, महाराष्ट्राचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मदन भोसले, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच आमदार राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) ऑगस्ट महिन्यात साखर कारखान्यांकडून २०२१-२२ या हंगामासाठीच्या एफआरपीला मंजुरी दिली होती. कॅबिनेटने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २९० रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link