मेरठ : राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या ऊस उत्पादन स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची गरज आहे. ऊस विभागाकडून आयोजित राष्ट्रीय कृषी विकास योजनअंतर्गत ही स्पर्धा होणार आहे. त्यात विजेता ठरणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षिस आहे.
ही स्पर्धा उसाची लावण आणि खोडवा अशा दोन गटात आयोजित केली जाते. अधिकाधिक शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होता यावे, यासाठी याची मुदत वाढवून १५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. ऊस विभागाचे उपायुक्त राजेश मिश्र यांनी सांगितले की, २०२१-२२ या हंगामातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. यापूर्वी ही तारीख ३० सप्टेंबर होती. शेतकरी ऊस विकास परिषदेकडून अर्ज घेऊन निश्चित केलेल्या शुल्कासह तो जमा करू शकतात. ही स्पर्धा लागण आणि खोडवा अशा उसाच्या दोन गटात आयोजित केली जाते. स्पर्धेत विजेता ठरणाऱ्याला ५०,००० रुपयांचे बक्षिस दिले जाते असे उपायुक्त मिश्रा यांनी सांगितले.