बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
जिल्हाधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे आदेश : 957 कोटी 41 लाख थकित
कोल्हापूर, ता. 31 :उसाच्या एफआरपीची रक्कम चौदा दिवसात दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तर, चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणा), पंचगंगा (इचलकरंजी), गुरूदत्त शुगर्स (टाकळवाडी), इको केन (म्हाळुंगे) व जवाहर (हुपरी) कारखान्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील 21 कारखान्यांनी 957 कोटी 41 लाख 16 हजार रुपये थकवले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज दिलेल्या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे आदेश जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला मिळाले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 35 साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहत. यामध्ये 23 कारखान्यांना कारणे दाखवा तर 12 कारखान्यांवर साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि आवश्यकतेप्रमाणे कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून आणि त्याची विक्री करून उसाची एफआरपी देण्याचे आदेश साखर आयुक्त गायकवाड यांनी दिले. दरम्यान, चौदा दिवसानंतर 15 टक्के व्याजही द्यावीत अशा सूचनाही दिल्या आहेत. कोल्हापूरातील दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलवळ), वारणा, पंचगंगा, गुरूदत्त शुगर्स, इको केन व जवाहर कारखान्याची साखर, मळी, बगॅस जप्तीसह जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत. तर, आजरा, अप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज), भोगावती (परिते), छत्रपती राजाराम (कसबा बावडा), छत्रपती शाहू (कागल), डॉ. डी. वाय. पाटील (वेसरफ तर्फे पळसंबे), दालमिया भारत शुगर ( आसुर्ले-पोर्ले), दुधगंगा-वेदगंगा (बिद्री), अथनी शुगर (तांबाळे), कुंभी कासारी (कुडित्रे), रियाबल शुगर महाडिक (फराळे), ओलम शुगर (हेमरस, राजगोळी खुर्द), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा) व उदयसिंह गायकवाड (सोनवडे-बांबवडे) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शनिवारी (ता. 1) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयामध्ये सुनावणी होणार आहे. योग्य कारण न दिल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील विश्वासराव नाईक (शिराळा), केन ऍग्रो (रायगाव), निनाईदेवी-दालमिया (कोकरूड), श्री महाकाली (कवठेमहाकाल), दत्त इंडिया (सांगली) या कारखान्यावर जप्ती आदेश दिले आहेत. तर, उदगिरी शुगर (बामणी), सोनहिरा (वांगी), सदगुरू शुगर्स (राजेवाडी), राजारामबापू पाटील युनिट 2 (वाटेगाव सुरूल), सर्वोदय (करंदवाडी), राजारामबापू पाटील युनिट 1 (राजारामनगर, साखराळे), मोहनराव शिंदे (मोहन आरग), क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड (कुंडल) व क्रांतीवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी (वाळवा) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारखान्यांची सुनावणीही शनिवारी होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे असणारी थकीत एफआरपी
कारखाना* थकीत एफआरपी रक्कम
आजरा* 35 कोटी 11 लाख 80 हजार
अप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज)* 26 कोटी 70 लाख 76 हजार
भोगावती (परिते)* 40 कोटी 77 लाख 45 हजार
छत्रपती राजाराम (कसबा बावडा)* 44 कोटी 75 लाख 39 हजार
छत्रपती शाहू (कागल)* 64 कोटी 4 लाख 24 हजार
डॉ. डी. वाय. पाटील (वेसरफ तर्फे पळसंबे)* 30 कोटी 44 लाख 43 हजार
दालमिया भारत शुगर (आसुर्ले-पोर्ले)* 83 कोटी 94 लाख 97 हजार
दुधगंगा-वेदगंगा (बिद्री)* 60 कोटी 69 लाख 69 हजार
अथनी शुगर (तांबाळे)* 26 कोटी 50 लाख 32 हजार
कुंभी कासारी (कुडित्रे)* 44 कोटी 61 लाख 55 हजार
रियाबल शुगर महाडिक (फराळे)* 22 कोटी 73 लाख 2 हजार
ओलम शुगर (हेमरस, राजगोळी खुर्द)* 59 कोटी 21 लाख 53 हजार
सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा)* 41 कोटी 33 लाख 81 हजार
उदयसिंह गायकवाड (सोनवडे-बांबवडे)* 28 कोटी 9 लाख 25 हजार
* जप्ती आदेश :
दत्त (शिरोळ)* 24 कोटी 36 लाख 46 हजार
संताजी घोरपडे (बेलेवाडी)* 57 कोटी 89 लाख 16 हजार
वारणा (वारणानगर)* 116 कोटी 2 लाख 8 हजार
पंचगंगा(इचलकरंजी)* 74 कोटी 39 लाख 6 हजार
गुरूदत्त शुगर्स (टाकळवाडी)* 58 कोटी 56 लाख
इको केन (म्हाळुंगे)* 17 कोटी 20 लाख 19 हजार
जवाहर (हुपरी)* 37 कोटी 47 लाख 15 हजार
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp