अमरोहा : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री कमाल अख्तर यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले आणि इतर अडचणी सोडविण्याची मागणी केली. सरकारने ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली.
समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या माजी मंत्री कमाल अख्तर यांनी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी केली. हसनपूर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे १७ कोटी रुपये खतवले आहेत. ते एका आठवड्यात द्यावेत अशी मागणी केली. याबाबत राज्यपालांच्या नावे असलेले सात कलमी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे वाढवावीत, ऊस दर ४५० रुपये करावा, हसनपूर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासह भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावावर तोडणी पावत्या द्याव्यात अशी मागणी केली.
यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हा महासचिव अख्तर, चंद्रपाल कसाना, संदीप गुर्जर, यूसुफ कुरैशी, पवन अग्रवाल, नवल कुमार, सुल्तान सैफी, वसीम मलिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.