सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात उसाच्या एकरकमी एफआरपीसाठीचे आंदोलन गतिमान केले आहे. जिल्ह्यातील ज्या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्यास नकार दिला आहे, अशा कारखान्यांविरोधात आंदोलन करण्यता येत आहे. माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने चालू हंगामात एफआरपी एकरकमी देण्यासह प्रती टन ४०० रुपये अधिक देण्याची मागणी केली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, संघटनेच्या सदस्यांनी ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांची चाके पंक्चर केली आहेत. अनेक ठिकाणी वाहने रोखण्यात आली आहेत. कारखआन्यांनी एकरकमी एफआरपी देण्यास मनाई केल्यानंतर त्यांच्या विरोधातील आंदोलन गतिमानकरण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी आधीच एकरकमी एफआरपीची घोषणा केली आहे. मात्र, शेजारील सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी यास नकार दिला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी शेतकऱ्यांशी करार केले आहेत. त्यानुसार, हफ्त्याने एफआरपी मिळणार आहे. यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे.