युक्रेनमध्ये आतापर्यंत ५,६२,३०० टन साखरेचे उत्पादन

कीव : युक्रेनमध्ये ९ नोव्हेंबरअखेर ५,६२,३०० टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. त्यासाठी ६.२४ मिलियन टन बिटचे क्रशिंग करण्यात आले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स उक्रत्सुकोरच्या एका अहवालानुसार सप्टेंबर ते ऑगस्ट या चालू हंगामात साखर उत्पादन करणाऱ्या ३३ कारखान्यांपैकी सध्या २९ कारखाने बिटवर प्रक्रिया करीत आहेत.

कृषी धोरण आणि अन्नधान्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, ९ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ८.८२ मिलियन टन बिटची तोडणी केली आहे. एकूण अनुमानाच्या ८२.९ टक्के हे प्रमाण आहे. याशिवाय जॉइटॉमीर विभाग राज्य प्रशासनाच्या कृषी-औद्योगिक विभागाने ४ सप्टेंबरपासून सुरू झालेला हंगाम संपल्याची घोषणा केली आहे. या विभागात बिटवर पीआरजेएससी चेर्वोन शुगर मील आणि सिग्नेट सेंटर एलएलसीकडून प्रक्रिया करण्यात आली आहे. कृषी – औद्योगिक विकास विभागाच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्यपणे जॉइटॉमिर विभागात ८ नोव्हेंबरपर्यंत ३,३४,००० टन बिटपासून ४७,९०० टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. या अहवालातील माहितीनुसार, देशात बिटवरील प्रक्रिया सध्याच्या हंगामात २१ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here