मुंबई : महाराष्ट्रात गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, गेल्या हंगामात शंभर टक्के एफआरपी देण्यात अपयशी ठरलेल्या साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाना दिलेला नाही.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, जे साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊसाची बिले देण्यात अपयशी ठरले आहेत, त्यांना या हंगामात गाळप सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अलिकडेच मुंबईत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गायकवाड यांनी सांगितले की, अशा साखर कारखान्यांना परवानगी देण्यात येणार नाहीत. जोपर्यंत ते एफआरपी देत नाहीत, तोपर्यंत प्रक्रिया केली जाणार नाही. या भूमिकेचा सकारात्मक परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले दिली जात आहेत. आगामी काही दिवसांत कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देतील.