महाराष्ट्रातील गाळप हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, ११ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील एकूण ११८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ५५ सहकारी आणि खासगी ६३ कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७७.८१ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून यापासासून ६५.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील २०२०-२१ या हंगामातील ऊस क्षेत्र ११.४८ लाख हेक्टरपासून ११ टक्क्यांनी वाढून २०२१-२२ या हंगामात १२.७८ लाख हेक्टर झाले आहे. राज्यात पाऊस अतिशय चांगला झाला आहे. यासोबतच राज्यातील सर्वच विभागातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. इथेनॉलसाठी वळविण्याऐवजी थेट साखर उत्पादन झाले तर महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात सुमारे १२२.५ लाख टन साखर उत्पादन होऊ शकते.