मुकेरिया : जर राज्यात शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीच्या युतीचे सरकार सत्तेवर आले, तर साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळावीत यासाठी नवा कायदा लागू केला जाईल. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबिर सिंह बागल यांनी ही घोषणा केली आहे.
शिअदचे अध्यक्ष बादल यांनी या निवडणूक मतदारसंघातील विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये बोलताना सांगितले की, साखर कारखाने एक -एक वर्षानंतर ऊस बिले देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. ही बाब योग्य नाही. आम्ही नव्याने याबाबत कायदा करू. त्यातून साखर कारखान्याच्या मालकांना ऊस गाळप झाल्यानंतर तीन महिन्यात शेतकऱ्यांना सर्व पैसे द्यावे लागतील. जर असे पैसे देण्यात ते अयशस्वी ठरले तर त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्याची तरतूद केली जाईल.
बादल म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून निश्चित केलेले ३६० रुपये प्रती क्विंटल ऊस दर मिळेल याची काळजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी घेण्याची गरज आहे. बादल यांनी मुकेरिया मतदारसंघातील उमेदवार सरबजोत साबी यांच्या प्रचारासाठी मेळावा घेतला.