उत्तर प्रदेशमध्ये गळीत हंगामासोबत ऊस बिल देण्यातही गती

उत्तर प्रदेशमध्ये गळीत हंगाम सुरू होण्यासह ऊस बिले देण्यास गती मिळाली आहे. २०१७-१८ पासून आतापर्यंत एकूण १,४४,५२३.०५ कोटी रुपयांची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत.

सध्याच्या सरकारकडून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये २८३.४१ कोटी रुपये, गळीत हंगाम २०२०-२१ मधील २९१८७.२९ कोटी रुपये, गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ३५,८९८.८५ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ३३,०४८.०६ कोटी रुपये, २०१७-१८ मध्ये ३५,४४४.०६ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यासह गळीत हंगामातील १०,६६१.३८ कोटी रुपयांच्या थकबाकीसह सर्व बिले अदा करण्यात आली आहेत.

गळीत हंगाम २०१९-२० मध्ये उसाचे गाळप केलेल्या ११९ साखर कारखान्यांनी शंभर टक्के ऊस बिले दिली आहेत. यासोबतच २०१८-१९ मध्ये सुरू राहिलेल्या सर्व ११९ कारखान्यांनीही शेतकऱ्यांना उसाचे शंभर टक्के पैसे दिले आहेत. तर गळीत हंगाम २०१७-१८ मध्ये एकूण देय असलेल्या ३५,४६३.७१ कोटी रुपयांच्या तुलनेत ३५,४४४.०६ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. एकूण बिलांच्या तुलनेत हे प्रमाण ९९.९४ टक्के इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here