पाटणा : बिहारचे सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
ऊस विभागाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, की, २००६-०७ पासून ऊस उत्पादकांच्या हितासाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. ऊसाच्या दरात वाढ, ऊस खरेदीवरील करात सूट, विभागीय विकास परिषद अशा निर्णयांचा यात समावेश आहे. बिहार सरकार ऊस दरावर अनुदानही देते असे नीतीश कुमार म्हणाले.
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, ऊस उत्पादनात सुधारणेसाठी ऊस उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी रीगासह इतर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी अनुदान वाढविण्याचेही निर्देश दिले. या बैठकीत ऊस विभागाचे सचिव एन. श्रवण कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना २०२१-२२ या वर्षासाठीचा ऊस दर, २०१० ते २०२१ पर्यंतच्या ऊस दराची माहिती, विभागाच्या कामगिरीचा आढावा सांगितला.